दत्तात्रय आनंदा कांबळे वय वर्षे 35 राहणार भिलवडी. दैनिक लोकमत कोल्हापुरच्या ऑफिसमध्ये शिपायाचं काम करणारा हा दत्ता 2005 साली बत्तीस शिराळ्यात नागपंचमीला भरलेल्या यात्रेत दैनिक लोकमतच्या वृत संपादक आणि काही पत्रकार टीम सोबत गेला होता. बत्तीस शिराळ्याची ही यात्रा महाराष्ट्राभर प्रसिध्द आहे. या यात्रेत हजारो भावीकांच्या समोर जिवंत नाग पकडून त्यांची गावाच्या चौकाचौकातून मिरवणूक काढली जाते. त्या जीवंत नागांना सर्प मित्रांकडून आज ही खेळवलं जातय. या यात्रेचा आढावा घेण्यासाठी दता ही टीम सोबत शिराळ्यात पोहचला होता. एका चौकात मिरवणूक येऊन थांबली होती. एका ट्रॅक्टर मध्ये डॉल्बी रचला होता. त्याच्या पाठीमागच्या एका ट्रक मध्ये मुली नाचत होत्या. आणि त्याच्या पाठीमागे गावातल्या प्रत्येक ग्रुपचा एक ट्रॅक्टर असे सात ट्रॅक्टर मिरवणूकीत होते. त्या सात ट्रॅक्टर मध्ये नाग खेळवले जात होते. ट्रॅक्टरच्या चारी बाजूंनी पाहणारांनी गर्दी केली होती. डॉल्बीचा आवाज आणि माणसांच्या ओरडण्याचा, किंचळण्याचा आवाज गावभर घुमत होता. नागाचा हा सारा खेळ रस्त्याच्या कडेला लावलेल्या एका बैल गाडीत उभा राहून दत्ता पाहत होता. अचानक त्याच्या समोरच्या ट्रॅक्टरमधल्या नागाच्या जोडीने ट्रॅक्टर खाली बाजूला उभे राहीलेल्या जमावात उडी घेतली. माणसांची एकच तारांबळ उडाली. जीव मुठीत धरुन जमावातली माणसं रस्त्याच्या बाहेर वाट दिसेल तीकडे पळू लागली. जमाव उदळल्यानं बैलगाडीला धक्का बसला बैलगाडीत उभी असणारी माणसे ही घाबरलीत तेही जीव वाचवण्यासाठी उतरु लागली पळू लागली त्यातचं दत्ताला धक्का बसला आणि दत्ता बैलगाडीतून खाली पडला. तो ही उठून पळू लागला. खाली पडलेल्या नांगाना सर्प मित्रांनी पुन्हा ट्रॅक्टरवर आनलं आणि पुन्हा खेळ सुरु झाला. लोकमतच्या टिमने आपलं सार काम आटपून घेतलं आणि सायंकाळी सातच्या सुमारास शिराळा सोडला.
- के.प्रफुल्ल
दत्ताला घरी यायला रात्री दहा वाजले. आपल्या बायको आणि मुलांबरोबर जेवनं आटपुन दत्ता झोपला. मध्य रात्री बारा वाजल्या पासुन अचानक दत्ताला रक्ताच्या उल्ट्या चालू झाल्या. एकट्या बायकोने कसबस करुन त्याला हॉस्पीटल मध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले त्यानंतर त्यांनी सांगीतलं दत्ता आता बोलू शकणार नाही. कारण दत्ता जेव्हा बैलगाडीतून पडला तेव्हा त्याच्या लहान मेंदूला लागलं होतं. त्याचं माणसीक संतूलन बिघडल होतं. त्यात त्याची वाचा गेली होती.
दत्ताच कुटूंब गरीबीचचं होतं. दता आजारी असल्यान घरची सारी जबाबदारी त्याचा मोठा भाऊ चंदू वर आली होती. चंदू आणि शेतात राबणारी त्याची बायको या दोघांवर अवलंबून 6 जनांचं कुटूंब. दोघांच्या मिळकतीतून सहा जनांच्या पोटाची खळगी भरुन दोन मुलांच शिक्षण बघतं आईचा औषधाचा खर्च आणि दत्ताची ट्रीटमेंटचा खर्च चंदू एकटा बघत होता. लहान मेंदुला मार लागल्यानं दत्ताच्या आजारपणाचा खर्च त्या कुटूंबाला पेलणारा नव्हता. जमेल तेवढी ट्रिटमेंट त्यांनी केली होती. दैनिक लोकमतच्या कोल्हापुर ऑफिसमधुन काही मदत मिळाली. पण दत्ताच्या आजारापुढे ती तुटपुंजी होती.
दत्ताला हॉस्पीटल मधून घरी आणल्यापासुन दत्ता सतत बोलण्याचा प्रयत्न करतोय. घराशेजारी असलेल्या शाळेच्या बाहेर व्हरांड्यात बसुन पाठीवर गीरवण्याचा प्रयत्न आजही करतोय. लहान मुले पाढे म्हणतात ते पाहून पुटपुटण्याचा प्रयत्न करतोय. एम ए पुर्ण झालेला दत्ता शाळेच्या खिडकीतून फळ्यावर लिहीलेल डोळ्याने वाचण्याचा प्रयत्न करताना आम्ही पाहीलय. पण त्याच्या तोंडूण शब्दचं फुटत नाही. बुध्दीच्या जोरावर आजवर कुणासमोर न झुकलेला दत्ता आज रस्त्यावरुन जात असनार्या लहान मुलाचही पाय धरतोय आणि ढसाढसा रडतोय. त्याच्या मनातली घालमेल तो कोणालाच सांगू शकत नाही. तो बोलू शकत नसल्यान जेव्हा जेव्हा त्याला एकटेपणची जाणीव होते, तेव्हा तो आत्महतेचा प्रयत्न करतो. स्वताला मारुन घेतो. डोकं भितीला आपटून रक्तचींब होतो. कधी सहन झाल नाही की बायकोलाही मारहान करायचा. दत्ताच्या या त्रासाला कंटाळून त्याची बायको दोन मुलसहीत माहेरी गेली. आतापर्यंत चार ते पाच वेळ त्याने आत्महतेचा प्रयत्न केला. कधी कासरा घेऊन शेतात पळत सुटायचा. तर कधी नदिच्या पुलावर जायचा. पण त्याच्यावर त्याच्या 70 वर्षाच्या आईचं सतत लक्ष असल्यानं तो बचावत गेला. पण आता त्यांन त्याच्या आजारावर मात केलीय. त्याच्या भावाच्या वहिणीच्या आणि आईच्या कष्टाला खर्या अर्थान यश मिळालय. त्याची माणसीक परीस्थीती आता सुधारलीय. आता घरात प्रत्येक कामात मदत करतोय. घरात पाणी भरण्यापासुन जनावरं सांभाळण्यापर्यंत सर्व काही व्यवस्थीत करतो. पण हे सगळं ठिक होत असताना मनात थोडीशी कुनकुन लागून राहीलीय. दत्ता बोलू शकला तर...- के.प्रफुल्ल
No comments:
Post a Comment