(केस स्टडी शुट करायला गेलो असताना....)
मुलगी जन्माला घालण्याबाबत अजूनही काही लोकांची मानसिकता इतकी वाईट असेल अस कधीच वाटतं नव्हतं.
आई वडिलांना वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा होता. पण एकमेकांच्या शरीराला चिकटलेल्या बहिणी जन्माला आल्या. मुलगी जन्माला आली म्हणून वडील चिडले होतेचं. त्यात त्या एकमेकांच्या शरीराला चिकटलेल्या असल्यान अधीकच संतापले होते. अश्या चिकटलेल्या दोन मुली जन्माला आल्या असल्याचं शेजाऱ्यांना समजलं. "तुझ्या घरात देवीचा कोप झाला. म्हणून अश्या मुली जन्माला अाल्या." अस शेजारी वडीलांना बोलू लागले. मुली नको असलेल्या बापानं मुली हॉस्पीटलमधून घरी आल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी मुंलीना जीवंत दफन करायचं ठरवलं. हृदय हेलावून टाकणारं हे प्रकरण जेंव्हा प्रथम संस्थेला समजलं. तेंव्हा पोलीसांच्या मदतीनं हस्तक्षेप करुन त्या मुलींना प्रथमने ताब्यात घेतलं आणि उपचारासाठी वाडीया चिल्ड्रन हॉस्पीटल मुंबई या ठिकाणी भर्ती केलं.
या दोघींना वेगळ करनं म्हणजे खुप मोठ आव्हान होतं. वाडीया हॉस्पीटल स्थापन झाल्यापासुनची अशी ही पहीलीचं केस होती. महत्वाचं म्हणजे अश्या चिंताजनक शस्त्रक्रियांमध्ये एकचं समस्या उद्भवली जाते. ती म्हणजे अश्या दोन चिकटलेल्या जिवांपैकी एखादा जिव गमवावा लागतो. अश्या भयावह परीस्थीतीत नाही नाही म्हणतं हे आव्हान वाडीया हॉस्पीटलने स्विकारलं. या शस्त्रक्रियेला खुप खर्च येणार होता. पण प्रथम आणि प्रथमसारख्या बऱ्याच सामाजीक संस्थांचा मदतीचा हातभार या शस्त्रक्रियेसाठी लाभला. शस्त्रक्रियेची तयारी सुरु झाली. मुंबई आणि मुंबईबाहेरील स्पेशलीस्ट डॉक्टर्स या ऑपरेशनसाठी बोलवण्यात आले. न्युरोलॉजीस्ट, हार्ट स्पेशलीस्ट, ब्रेन स्पेशलीस्ट, अर्थोपेडीक स्पेशलीस्ट, प्लास्टीक सर्जरी स्पेशलीस्ट अशा अनेक तज्ञ डॉक्टरांची फौज बोलवण्यात आली. शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. आठ महिण्याचे असताना एकमेकांना चिकटलेले दोन जीव वेगळे करायला सुरुवात झाली. डॉक्टरांपासुन हॉस्पीटलचा सर्व स्टाफ ही शस्त्रक्रिया सुखरुप व्हावी यासाठी प्रार्थना करतं होतं. तब्बल सात आठ तासांनी ही शस्त्रक्रिया संपली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आठ महिण्याचे हे दोन जीव एकमेकांपासुन वेगळे झाले. या चिमुकल्या हॉस्पीटलमध्ये जेंव्हा मृत्यूशी झुंज देत होत्या, तेंव्हा त्यांच्या आई वडीलांना कल्पना ही नव्हती आणि त्यांनीही मुली नेल्यापासुन त्यांची विचारपुस केली नाही. जन्मत:च या दोन जीवांना साधं नाव ही त्यांच्या निर्दयी आईवडीलांकडून लाभलं नाही.
हॉस्पीटल मध्ये असतानाच त्यांच नामकरण करण्यात आलं. हे दोन जीव आता रिद्धी आणि सिद्धी या नावाने ओळखले जातायत. हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यापासुन आता पर्यंत त्या तिथेच आहेत. त्यांच्या संगोपनासाठी प्रथमने एका केअर टेकर मावशींची नेमणूक केली आहे. त्यांच्या संगोपनाचा संपुर्ण खर्च प्रथम संस्थाच करते. आता रिद्धी आणि सिद्धी तिन वर्षाच्या आहेत. आतापर्यंत यांच्यावर तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. दोन बाकी आहेत.
रिद्धी सिद्धी आता स्वतंत्र वाढत आहेत. वाडीया हॉस्पीटलच्या आवारात फुलपाखरासारख्या बागडत आहेत. आता त्या सामान्य मुलांप्रमाने पुढचं जीवन जगू शकतात. तीन वर्षाच्या या पोरक्या चिमुकल्यांना आता प्रथम सारखं मोठं कुटूंब लाभलय.
- के.प्रफुल्ल
