दोस्तहो इटली सारख्या प्रगतशील देशात corona सारख्या आजाराने दिवसाला 600 ते 800 लोकांचा मृत्यू होतो. यामुळे हतबल झालेले इटली चे पंतप्रधान Giuseppe conte हे रडतात. तर भारतासारख्या देशात corona रुग्णाचे प्रमाण दिवसा दिवसाला वाढत असून, संपूर्ण जग या आजाराच्या दहशतीखाली जगात आहे.
अश्या परिस्थितीत पंतप्रधानाच्या सांगण्यावरून आपण टाळ्या वाजवतोय. घोषणा देत ताट वाजवतोय. डिजे, बँजो लावून मिरवणूक काढतोय. यावर पंतप्रधानांना याच गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न पडतो.
पंतप्रधानांनी टाळ्या आणि थाळ्या वाजवायला सांगण्या ऐवजी देशातल्या वैद्यकीय क्षेत्रात लागणाऱ्या सुविधा वाढवाव्यात. देशाची लोकसंख्या पाहता देशात एक लाख व्हेंटिलेटर ची उपलब्धता आहे. दिड कोटी लोकसंख्या असलेल्या देशात एक लाख व्हेंटिलेटर हा आकडा तुटपुंजी आहे. Corona सारख्या विषाणूची टेस्ट करण्यासाठी लागणाऱ्या टेस्ट लॅब वाढवण्याची गरज आहे.
गेल्या काही दिवसात भारतात कोरोना सारख्या विषाणूचे सावट आहे. सध्या प्रत्येक दिवसात जवळजवळ चाळीस ते पन्नास रुग्णांची वाढ होताना दिसून येते. यात महाराष्ट्राच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. सध्याची परिस्थिती फार गंभीर जरी असली तरी महाराष्ट्रात सरकार तितक्याच काळजीपूर्वक ही समस्या हाताळत असताना दिसून येते.
एकीकडे पोलीस अधिकारी समोर येऊन घरी बसण्याचे आव्हान करत आहेत. या विषाणूचा संसर्ग जर थांबवायचा असेल तर प्रत्येकाने घरी थांबण्याचे आव्हान ते करत आहे. तरी देखील आपण रस्त्यावर उतरुन डिजे लावून मिरवणुक काढणं हे भयंकर आहे.
राज्यातले आणि देशातले डॉक्टर्स, हॉस्पिटल स्टाफ, पोलीस आणि सफाई कर्मचारी हे स्वतःचा जीव धोक्यात घालून, कुटुंब बाजूला ठेवून आपलं कर्तव्य निष्ठेने बजावत आहेत. यांच्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करण्या ऐवजी प्रशासनाने दिलेले आदेश पाळले तर घरात बसून या संसर्गला रोखण्यासाठी आपण त्यांची मदत करू शकतो.
काल रात्री बारापासून कलम 144 नुसार महाराष्ट्रात संचार बंदीचा आदेश माननीय मुख्यमंत्री यांनी काढला आहे. आज जिल्ह्याच्या बॉर्डर बंद केल्या असून शक्य झाल्यास गावच्या बॉर्डर हि बंद कराव्या लागतील. एका गावातून दुसऱ्या गावात जाणं ही बंद होईल. या साऱ्या घटनांमुळे घाबरून न जाता शासनाच्या आदेशाचे पालन आपण सर्वांनी करावे. देशप्रेम घोषणा देऊन आणि राष्ट्रगीत म्हणून दिसून येतं, असं नाही. तर घरात बसून लोकांचे जीव वाचवून देश प्रेम सिद्ध करण्याची वेळ आली आहे. आपली सुरक्षा हिच जनतेची सुरक्षा.
©️के.प्रफुल्ल