ग्रॅज्यूएशनसाठी भिलवडीच्या चितळे महाविद्यालयात अॅडमिशन घेतल होत. FY ला कस बस एटी केटी मिळवून SY ला गेलो. डान्स ग्रुप मुळे भिलवडी बरोबर भिलवडी परीसरात जवळजवळ सगळ्यांना परिचीत झालो होतो. ग्रॅज्यूएशनच्या पहिल्या वर्षी युथ फेस्टीवल मध्ये डान्स परफॉर्म केला होता. तो खुप सुरेख झाला होता. कॉलेजच्या प्राचार्यांनपासुन पीयून पर्यंत सगळ्यांना आवडलेला होता. त्यामुळे दुसर्याही वर्षी युथ फेस्टीवल मध्ये सहभाही होण्याचा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी पुन्हा आम्ही सहभागी झालो. ते फेस्टीव्हल कडेगाव ला होत. तो ही परफॉर्म चांगला झाला. कडेगाव हून येताना चहासाठी पलूसला गाडी थांबवली. एका हॉटेल मध्ये सर्व मुलं मुली आम्ही एकत्र बसलो. त्यात एक मुलगी अतिशय सुंदर जीला मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. तीची विचारपुस केली असता तीने ही मला पहिल्यांदाच पाहिल्याचं सांगीतल. बोलता बोलता हे पण बोलली की मी ग्रॅज्यूएशनच्या दुसर्या वर्गात शिकते. मी पण दुसर्याच वर्गात शिकत होतो पण वर्ग खोलीचा आणि माझा दोन वर्षात फक्त परिक्षेलाच संबंध येत होता. त्यामुळे आम्ही एका वर्गातले असुन एकमेकाला पाहिलं नव्हतं. दुसर्या दिवसापासुन मला कॉलेजला जायला कारण मिळाल होतं. मी कॉलेजला जाऊन लेक्चरला बसु लागलो. महिणा भर रेग्युलर कॉलेजला जाऊन दिवसातला एक क्षण तीच्या सोबत घालवू लागलो.
प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आनंदाचा आणि अविस्मरणीय दिवस म्हणजे वाढदिवस. असाचं एक आनंदाचा दिवस म्हणजे तीचा वाढदिवस आणि माझा ही आनंदाचा दिवस. माझा तीन दिवसा नंतर बर्थडे आहे. अस तीने मला सांगीतलं. त्यावेळी आमच्या कॉलेजचा एन.एस.एस कँम्प भिलवडीच्या शेजारच्याच गावी होता. मी पहिल्यांदाच एन.एस.एस कँम्प मध्ये सहभागी झालो होतो. स्वच्छतेचं काम चांगल्या प्रकारे चालू होतं. तीचा वाढदिवस दोन दिवसावर आला होता. मी तीला वाढदिवसाच गिफ्ट द्यायच ठरवलं. वाढदिवसाच्या अधल्या दिवशी मी आणि माझा मित्र शंभर रुपयाच पेट्रोल भरुनं सांगलीला गिफ्ट आणायला गेलो. सीटी मॉल पासुन बीग बझार पर्यंत आणि आर्चीस गॅलरी पासुन डी मार्ट पर्यंत सर्व दुकानं पिंजून काढली. पण गिफ्ट आवडत नव्हतं. जर आवडलचं तर ते खिश्याला परवडनारं नव्हतं. गिफ्ट पहिल्यांदा कोणत्यातरी मुलीला देतं असल्यानं ते काय द्यायचं हे काहीच कळत नव्हतं.
एवढ्या ठिकाणी शोधून झाल्यावर झी बझार मध्ये मला माझ्या खिश्याला परवडनारं अस गिफ्ट मिळालं. दुसर्या दिवशी ते गिफ्ट घेऊन मी एन.एस.एस कॅम्प मंध्ये आलो. गीफ्ट दिल्यावर ती घेईल का? काय बोलेल का? काय करेल का? अस मीच मला विचारत होतो. शेवटी द्यायच ठरवलं. पण समोरा समोर नाही. सारे विद्यार्थी स्वच्छतेला गेले असता हळूचं घाबरत,थरथरत ते गिफ्ट तीच्या बॅग मंध्ये ठेवलं. आता तर खुपच भिती वाटू लागली. कॅम्प मध्ये तीन वाजता व्याख्यान असल्यानं ती कार्यक्रमाच सुत्रसंचलन करणार होती. त्यासाठी बॅग घेऊन तीच्या एका मैत्रीणी सोबत चालली. मी लांबूनच पाहिलं होतं. फोनवर बोलण्याच नाटक करत तीच्या पाठीमागे गेलो. तीला आवाज दिला आणि तीला सांगीतलं. तुझ्या वाढदिवसाच गिफ्ट तुझ्या बॅग मध्ये आहे. तू घरी जाऊन बघ. कोण सोबत असताना पाहू नको. मैत्रीणींना सांगू नको. ती हसून हो म्हणाली आणि कार्यक्रमाकडे निघाली. येवढ्यावर मी शांत झालो. मनात चाललेली घालमेल काही वेळ थांबली. कार्यक्रम चालू व्हायला दहा मीनीट बाकी होती. मी स्टेज समोर कॅमेरा घेऊन थांबलेलो. तोवर मला माझ्या एका मित्राणे सांगीतले अरे तुला ती बोलवती आहे स्टेज पाठीमागे. पुन्हा मी घाबरत स्टेज पाठीमागे गेलो. आणि.......
तीच्या त्या हसत बोलेल्या वाक्यावर आजही मी आठवणीत आनंदात जगतोय
एन.एस.एस कॅम्प संपला पुन्हा कॉलेज सुरु झालं. महिण्या भरात खुप काही बोलनं झालं अगदि Family background पासुन आवडी निवडी पर्यंत. तीच्या मनमोकळ्या स्वभावानं ती मला खुपचं आवडू लागली. आणि मी तीला प्रपोज करायच ठरवलं. सुरुवातीला तीन चार दिवस बोलायला जायचो घाबरायचो पुन्हा न विचारताच यायचो. पण एक दिवस निश्चय केला आणि कॉलोजला गेलो लेक्चर संपलं. शिक्षक बाहेर गेले. ती माझ्या शेजारच्याच बाकावर बसली होती. वर्गात गोंगाट चालू होता. तीला मी बोलवलं आणि तीला विचारलं "एखाद्या मुलीला प्रपोज कसा करतात". ती हसतं म्हणाली "मला नाही माहीत, अजून अशी वेळ माझ्यावर नाही आली. पण का रे कोण आवडलं तुला" असा उलट प्रश्न तीने केला. याच उत्तर न देता मीच पुन्हा विचारलं," एखादि मुलगी मुलावर केव्हा प्रेम करते" "जेव्हा जास्त वेळ तिच्याबरोबर बोलण्यात घालवतो त्यानंतर कदाचित"अस तिचं उत्तर होतं. पण कोण आवडली रे तुला सांग ना, सांग ना प्लिज अस बोलली. आयुष्यात प्रपोज करण्याची माझी हि पहिलीच वेळ होती. मला कळायचं बंद झाल होतं. शब्द उमटत नव्हते. हृदयाचे ठोके जोरात धडके घेत होते. ही वेळ मला घालवायची नव्हती."मला जी मुलगी आवडते, जिच्यावर मी खुप प्रेम करतो ती तुचं अस म्हणालो आणि........
त्या दिवसा पासुन आज पर्यंत तंब्बल दोन वर्षे झाली मी तीला पाहिलं ही नाही अ्न बोलनं तर लांबचं.....
दोन वर्ष जीच्या फक्त आठवणीतचं घालवलीत. जीच्या स्वप्नात गेलीत. पुन्हा फक्त एक वेळ बोलण्यासाठी आणि भेटण्यालाठी दोन वर्ष आतून झूरत होतो. जीचा चेहरा बघण्यासाठी आज ही तडफडत होतो. जीचा आवाज एैकण्यासाठी मी तरसलो होतो. जीच हसणं पाहण्यासाठी मी हवालदिल झालो होतो. आज प्रत्यक्षात ती समोर आली आणि दोन वर्ष चाललेली ही घूसमट थांबली. किंचीतसा ही बदल तीच्यात झालेला नाही. तीच सुंदर दिसनं, तीच बिध्दास्त बोलनं, तीच निख्खळं हसणं आजही जसंच्या तसं. काही मीनिटं बोलणं झालं. कॉलेजमध्ये असतानाचा तीच्या सोबतचा सहवास आठवला. ती गेली तरी त्या आठवणीमध्येचं मी गुतूंन राहिलो.दोन वर्षाची चाललेली जिवाची ही धगधग काही क्षणात थांबली. ती आली. ती बोलली आणि ती गेली. जात असताना डोळे शांत ठेवून तिलाच बघतं होतो. पुन्हा कधी भेटेल? का आणखी दोन वर्ष वाट बघायला लागेल. याची रुकरुक अजून लागूनचं राहीली आहे

- के.प्रफुल्ल