Wednesday, 16 December 2015

फास्ट लोकल....

कॉलेजला जाण्यासाठी नेहमीच्या वेळेत सकाळी आठ वाजता मुलूंड स्टेशनवर पोहचलो. आठ पंधराची सी.एस.टी फास्ट आली. लोकल माणसांणी खचाखचं भरली होती. नेहमी प्रमाणे सकाळी ऑफिस,कॉलेज आणि कामाला जाणार्या माणसांची खुपच गर्दी होती. मुंबई लोकल ला मुंबईची लाईफलाईन म्हणतात त्याची जाणिव मला मुंबईत आल्यावरच झाली होती. ह्या गर्दीची आता सवय ही झाली होती. त्या गर्दीतूनचं लोकलमध्ये कसा बसा चढलो. माझ्या पाठोपाठ पस्तीशीतला व्यक्ती आणि त्याचा पाच वर्षाचा मुलगा ते दोघेही चढले. गर्दी असल्यान दोन्ही डोअरच्या मंध्येच थांबलो. गर्दीमुळे तो मुलगा गुदमरुन गेला होता. त्याची उंची कमी असल्या कारणानं त्याला श्वास घेता येतं नव्हता. मुलूंड हून लोकल सुटली. गर्दीन मी ही घामाघूम झालो होतो. गाडीन वेग पकडताच बाहेरचा वारा आत मध्ये येऊ लागला. म्हणतात ना बुडत्याल्याला काडीचा आधार तसं गुदमरन थोडस थांबलं. त्या लहान मुलानं गर्दीला घाबरुन त्याच्या वडीलाच्या मांडीला घंट पकडलं होतं. हे बापलेकं त्याच्या पाहूण्यांच्या लग्नाला चालले होते. ते कुर्ल्याला उतरणार होते. मुलूंड नंतर लोकल फास्ट असल्यान घाटकोपरला थांबनार होती. विक्रोळी स्टेशनला मागे टाकतं लोकल पुढं आली. गर्दी जशीच्या तशी होती. सिट वर बसलेली काही माणसं मोबाईल वर व्हिडीओ पाहत होते. कोण कानात हेडफोन टाकुन डोळे मिटून निवांतपणे गाणी एैकत होते. डब्याच्या मागच्या दोन बाकावर भजण म्हणनारा ग्रुप भजण म्हणत होता. त्याच गर्दीत एक प्रेमीयुगूल गर्दी असल्यानं डोअरच्या मधल्या स्पेस च्या एका कोपर्यात एकमेकाला समोरासमोरुन मिठी मारुन एकमेकाच्या कानात खुसपुसतं होते. भविष्याचे स्वप्न रंगवत होते. डोअरला लोंबकळणारी दोन तिन मुल बाहेर दिसणार्या मुलिंना पाहून शिट्या मारत होती. आणि काहीजनांची आपसात कुजबुज चालली असल्यानं खुपचं गोंधळ चालू होता. तेवढ्या गर्दीत आपल्या अंगाला धका लागु नये, आपला पाय तुडवला जाऊ नये, याची कळजी प्रत्येकजन घेत होता. त्या डब्यातले सर्वजन स्वताची निटपणे काळजी घेत होता. आपल्याला निट आणि मोकळ उभा राहण्या चा प्रयत्न प्रत्येकजन करत होता. दुसर्याला त्याचा कीतीही त्रास होऊ दे त्यांच्याकडे त्याच लक्ष नव्हतं. एवढ्यात त्या मुलाच्या वडीलाचा फोन वाजला त्याच गर्दीतून कसातर खीशात हात घालून त्यान फोन बाहेर काढला आणि कानाला लावला.त्याच बोलनं चालू झाल. घाटकोपरला लोकल थांबणार होती. स्टेशन जवळ आल होतं. तरी ह्याचा फोन चालूच होता. घाटकोपरला उतरणारे बसलेले लोक दोन्ही डोअरच्या मधल्या गॅप मध्ये येण्यासाठी धडपडू लागले. त्यांच्या ढकलण्यान चेगरा चेगरी परत चालू झाली. पुन्हा गुदमरु लागलं. छाती दोन्ही बाजूने दाबली जात होती. छातीत कळा मारु लागल्या. श्वास आता थांबतो की मग थांबतो. अस झाल होतं. असंख्य वेदना होतं होत्या. तो मुलगा श्वास घेण्यासाठी तोंड वर करत होता. पंप्पा पंप्पा म्हणून व्हीवळत होता. पण त्या गर्दीत त्याला तोंड वर ही करता येत नव्हतं. आणि त्याच्या वडीलाच ही लक्ष त्याच्यावर नसुन फोनवरच होतं. स्टेशन काही सेकंदच लांब होतं. लोकल थोडी स्लो झाली. बाहेर उतरण्यासाठी माणंस एकमेकांना ढकलू लागली. तरी त्या मुलाच्या वडीलाचा फोन चालूचं होता. पुढ ढकलण्यानं तो मुलगा बापाच्या पुढं केव्हा आला हे त्याला ही माहीती पडलं नाही. तरीही त्याच्या वडीलाच लक्ष त्या फोनवरचं होतं. लोकल प्लॅटफॉर्म वर आली वेग कमी होता. पाठीमागून प्रेशर लागतं असल्यानं त्या गर्दीतून मुलगा आता डोअरजवळ पुढं आला. आणि पाठीमागूणं एक जोरात धंका बसला. लोकल थांबायच्या आतचं तो मुलगा लोकलच्या बाहेर गेला. बाहेरुन प्लॅटफॉर्म वरच्या लोकांनी आरडाओरडा सुरु केला. बाहेरच्या ओरडण्यानं गाडीतून कोणीतरी पडल्याची ओरड चालू झाली. हा दंगा पाहून त्या मुलाच्या बापाने फोन ठेवला. आणि त्याच्या मुलाला इकडे तीकडे बघू लागला त्याला हाका मारु लागला. मुलगा हाकेला बोलेना म्हणून घामाघूम झाला. लोकल घाटकोपर स्टेशनवर थांबली. तो हाक मारतच लोकलमधून उतरला पाठीमागून दुसर्या डब्याजवळ खुपच गर्दी झाली होती. लोकल काही सेकंद थांबून पुन्हा कुर्ल्याच्या दिशेने गेली. कोणीतरी लहान मुलगा पडलाय याची चर्चा होत होती. हे एैकूनचं त्याच संपूर्ण अंग घामानं लबलबल होतं. त्याच्या पायाखालची जमीन त्याला उभ करतं नव्हती. त्या गर्दीकडे तो धाव घेऊ लागला. त्या मुलाच्या बॉडीकडे बघून आपल्या मार्गाने जात होता. त्या मुलाकडे पाहून कोणताच व्यक्ती त्याच्या जवळ जात नव्हता. त्यानं पाठीमागून गर्दीत बघीतलं आणि त्या मुलाचं नाव घेऊन हंबरडा फोडला. तो आक्रोश करु लागला. तो मुलगा पडून लोकल खाली गेला होता. त्या मुलाच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या होत्या. काही मिनीटांपुर्वी असलेला त्याचा मुलगा त्याच्याच चुकीमुळे हे जग सोडून गेला होता.आणि मुंबईची लाईफ लाईन डेथ लाईन होती तेव्हा...
                                                                         - के.प्रफुल्ल

पत्रकार

दत्तात्रय आनंदा कांबळे वय वर्षे 35 राहणार भिलवडी. दैनिक लोकमत कोल्हापुरच्या ऑफिसमध्ये शिपायाचं काम करणारा हा दत्ता 2005 साली बत्तीस शिराळ्यात नागपंचमीला भरलेल्या यात्रेत दैनिक लोकमतच्या वृत संपादक आणि काही पत्रकार टीम सोबत गेला होता. बत्तीस शिराळ्याची ही यात्रा महाराष्ट्राभर प्रसिध्द आहे. या यात्रेत हजारो भावीकांच्या समोर जिवंत नाग पकडून त्यांची गावाच्या चौकाचौकातून मिरवणूक काढली जाते. त्या जीवंत नागांना सर्प मित्रांकडून आज ही खेळवलं जातय. या यात्रेचा आढावा घेण्यासाठी दता ही टीम सोबत शिराळ्यात पोहचला होता. एका चौकात मिरवणूक येऊन थांबली होती. एका ट्रॅक्टर मध्ये डॉल्बी रचला होता. त्याच्या पाठीमागच्या एका ट्रक मध्ये मुली नाचत होत्या. आणि त्याच्या पाठीमागे गावातल्या प्रत्येक ग्रुपचा एक ट्रॅक्टर असे सात ट्रॅक्टर मिरवणूकीत होते. त्या सात ट्रॅक्टर मध्ये नाग खेळवले जात होते. ट्रॅक्टरच्या चारी बाजूंनी पाहणारांनी गर्दी केली होती. डॉल्बीचा आवाज आणि माणसांच्या ओरडण्याचा, किंचळण्याचा आवाज गावभर घुमत होता. नागाचा हा सारा खेळ रस्त्याच्या कडेला लावलेल्या एका बैल गाडीत उभा राहून दत्ता पाहत होता. अचानक त्याच्या समोरच्या ट्रॅक्टरमधल्या नागाच्या जोडीने ट्रॅक्टर खाली बाजूला उभे राहीलेल्या जमावात उडी घेतली. माणसांची एकच तारांबळ उडाली. जीव मुठीत धरुन जमावातली माणसं रस्त्याच्या बाहेर वाट दिसेल तीकडे पळू लागली. जमाव उदळल्यानं बैलगाडीला धक्का बसला बैलगाडीत उभी असणारी माणसे ही घाबरलीत तेही जीव वाचवण्यासाठी उतरु लागली पळू लागली त्यातचं दत्ताला धक्का बसला आणि दत्ता बैलगाडीतून खाली पडला. तो ही उठून पळू लागला. खाली पडलेल्या नांगाना सर्प मित्रांनी पुन्हा ट्रॅक्टरवर आनलं आणि पुन्हा खेळ सुरु झाला. लोकमतच्या टिमने आपलं सार काम आटपून घेतलं आणि सायंकाळी सातच्या सुमारास शिराळा सोडला.
दत्ताला घरी यायला रात्री दहा वाजले. आपल्या बायको आणि मुलांबरोबर जेवनं आटपुन दत्ता झोपला. मध्य रात्री बारा वाजल्या पासुन अचानक दत्ताला रक्ताच्या उल्ट्या चालू झाल्या. एकट्या बायकोने कसबस करुन त्याला हॉस्पीटल मध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले त्यानंतर त्यांनी सांगीतलं दत्ता आता बोलू शकणार नाही. कारण दत्ता जेव्हा बैलगाडीतून पडला तेव्हा त्याच्या लहान मेंदूला लागलं होतं. त्याचं माणसीक संतूलन बिघडल होतं. त्यात त्याची वाचा गेली होती.
दत्ताच कुटूंब गरीबीचचं होतं. दता आजारी असल्यान घरची सारी जबाबदारी त्याचा मोठा भाऊ चंदू वर आली होती. चंदू आणि शेतात राबणारी त्याची बायको या दोघांवर अवलंबून 6 जनांचं कुटूंब. दोघांच्या मिळकतीतून सहा जनांच्या पोटाची खळगी भरुन दोन मुलांच शिक्षण बघतं आईचा औषधाचा खर्च आणि दत्ताची ट्रीटमेंटचा खर्च चंदू एकटा बघत होता. लहान मेंदुला मार लागल्यानं दत्ताच्या आजारपणाचा खर्च त्या कुटूंबाला पेलणारा नव्हता. जमेल तेवढी ट्रिटमेंट त्यांनी केली होती. दैनिक लोकमतच्या कोल्हापुर ऑफिसमधुन काही मदत मिळाली. पण दत्ताच्या आजारापुढे ती तुटपुंजी होती. दत्ताला हॉस्पीटल मधून घरी आणल्यापासुन दत्ता सतत बोलण्याचा प्रयत्न करतोय. घराशेजारी असलेल्या शाळेच्या बाहेर व्हरांड्यात बसुन पाठीवर गीरवण्याचा प्रयत्न आजही करतोय. लहान मुले पाढे म्हणतात ते पाहून पुटपुटण्याचा प्रयत्न करतोय. एम ए पुर्ण झालेला दत्ता शाळेच्या खिडकीतून फळ्यावर लिहीलेल डोळ्याने वाचण्याचा प्रयत्न करताना आम्ही पाहीलय. पण त्याच्या तोंडूण शब्दचं फुटत नाही. बुध्दीच्या जोरावर आजवर कुणासमोर न झुकलेला दत्ता आज रस्त्यावरुन जात असनार्या लहान मुलाचही पाय धरतोय आणि ढसाढसा रडतोय. त्याच्या मनातली घालमेल तो कोणालाच सांगू शकत नाही. तो बोलू शकत नसल्यान जेव्हा जेव्हा त्याला एकटेपणची जाणीव होते, तेव्हा तो आत्महतेचा प्रयत्न करतो. स्वताला मारुन घेतो. डोकं भितीला आपटून रक्तचींब होतो. कधी सहन झाल नाही की बायकोलाही मारहान करायचा. दत्ताच्या या त्रासाला कंटाळून त्याची बायको दोन मुलसहीत माहेरी गेली. आतापर्यंत चार ते पाच वेळ त्याने आत्महतेचा प्रयत्न केला. कधी कासरा घेऊन शेतात पळत सुटायचा. तर कधी नदिच्या पुलावर जायचा. पण त्याच्यावर त्याच्या 70 वर्षाच्या आईचं सतत लक्ष असल्यानं तो बचावत गेला. पण आता त्यांन त्याच्या आजारावर मात केलीय. त्याच्या भावाच्या वहिणीच्या आणि आईच्या कष्टाला खर्या अर्थान यश मिळालय. त्याची माणसीक परीस्थीती आता सुधारलीय. आता घरात प्रत्येक कामात मदत करतोय. घरात पाणी भरण्यापासुन जनावरं सांभाळण्यापर्यंत सर्व काही व्यवस्थीत करतो. पण हे सगळं ठिक होत असताना मनात थोडीशी कुनकुन लागून राहीलीय. दत्ता बोलू शकला तर...
- के.प्रफुल्ल

भाऊसाहेब क-हाडे

एखाद्या व्यक्तीच उदिष्ट निश्चित असेल. तर त्या उदिष्टा पर्यंत पोहचण्यासाठी ती व्यक्ती जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मधे येणारे सगळे अडथळे पार करते. आणि आपल्या उदिष्टा पर्यंत पोहचते. त्यातलच एक उत्तम उदाहरण म्हणजे दिग्दर्शक भाऊराव क-हाडे. अहमदनगर जिल्ह्यातल्या हिंगणी या खेडेगावात जन्मलेल्या भाऊसाहेब क-हाडे यांच लहान पनापासुन सिनेमा बनवण्याच स्वप्न होत. सिनेमाच वेड असलेल्या भाऊसाहेबाची घरची परिस्थी बेताची होती. त्या काळी गावात एकच टिव्ही असल्यान गावातली सगळी मंडळी दुरदर्शनवरचा सिनेमा पहायला एकाच ठिकाणी यायची. वयाच्या सहाव्या वर्षी मैने प्यार किया हा सलमान खानचा पहिला चित्रपट भाऊसाहेबानी पाहीला होता. आणि तीथूनच सिनेमा बनवण्याच स्वप्न त्यांनी उराशी बाळगल होत. त्यानंतर दुरदर्शनवर लागणारे सगळे सिनीमे ते पहात होते. गावातच चैथी पर्यंतच शिक्षण घेऊन पुढच्या शिक्षणाला त्यांना शिरुरला जाव लागलं. पाचवीत शिरुरच्या विद्याधाम प्रशाला हायस्कुलला प्रवेश घेतला. पण सिनेमा विषयीच प्रेम त्यांना स्वस्थ बसु देत नव्हत. जेव्हा जेव्हा नवा सिनेमा येईल तेव्हा तेव्हा शाळा चुकवून शिरुरच्या मिनी थिअटर्सला तीन चार रुपये देऊन सिनेमा पहायला जायचे. सिनेमा बनवन्यासाठी कथेची गरज असते. आणि कथा लिहीन्यासाठी वाचनाची गरज असते. हे त्यांना माहीत होत. शिरुरला शिकत असताना पाचवी ते दहावी पर्यंत शाळेतल्या ग्रंथालयातील अनेक पुस्तके, कथा, कादंबरी यांच वाचन त्यांनी केल. आणि दहावी नंतर कविते पासुन लिखाणाची सुरुवात केली. आकरावीत शिकत असताना दिग्दर्शक व्हायच हे ठाम ठरवलं होत. दिग्दर्शनाच वेड असलेले भाऊसाहेब घरच्या कामात हि पटाईत होते. एकदा शेतातला कांदा विकायला पुण्याला गेले. पुण्यच्या गुलटेकडीवर गोडावून मध्ये रात्री मुक्काम केला. काद्याच्या गोण्यांवर आख्खी रात्र झोपुन काढली. दुसर्या दिवशी सकाळी गोडावून मालकाकडून उच्चल घेतली. गोडावूनच्या बाजूला असलेल्या एका हॉटेलमध्ये तोंड धुवून चहा नाष्टा केला. आणि घरी जाता जाता पुण्याच्या FTI (फिल्म अॅण्ड टेलिव्हीजन इन्स्टीट्यूट) मध्ये अॅडमिशन साठी चौकशी करण्यासाठी जायच त्यांनी ठरवल होत. FTI हे एक सिनेमा बनवण्याच प्रशिक्षण देणार इन्स्टीट्यूट आहे. हे त्यांनी वर्तमान पत्रात वाचलं होत. आपल्याला ही दिग्दर्शनाचे धडे या इंन्स्टीट्यूट मध्ये मिळू शकतात. हे समजल्यावर अॅडमीशनची चौकशी करण्यासाठी FTI च्या गेट वर गेले. त्यांनी अॅडमिशनची विचारपुस केली असता, गेटच्या गार्डने त्यांना मळलेल्या कपड्यात डोक्यापासुन पायापर्यंत न्याहळले. आणि अॅडनिशनसाठी ग्रॅज्यूएशन असावे लागते हे सांगीतले. त्यावेळी भाऊसाहेबांच ग्रॅज्यूएशन पुर्ण नसल्यान ते अॅडमिशन घेऊ शकले नाहीत. त्यानंतर मराठी विषयातून त्यांनी आपलं ग्रॅज्यूएशन पुर्ण केल. नंतर FTI ला अॅडमिशन घेण्याचा प्रयत्न केला पण इग्रजी कच्च असल्यांन तो हि प्रयत्न निष्फळ ठरला. ग्रॅज्यूएशन पुर्ण झाल्यावर सिनेमासृष्टीच्या माहेर घरी म्हणजे मुंबईला कम्युनिकेशन स्टडीजला त्यांनी अॅडमिशन घेतलं. त्या ठिकाणी समर नखाते सर यांच्याकडे ते सिनेमा शिकले. आणि इथून सुरुवात झाली एका ध्येयवेड्या दिग्दर्शकाची कहाणी. सिनेमा करायचा हे निश्चित ठरवल होत. पण कोणत्या विषयावर सिनेमा करायचा हे माहीत नव्हत. खोलवर जाऊन विचार न करता अवती भोवती असणार्या समस्या त्या समस्यांचे प्रश्न मांडणारा सिनेमा बनवायचं ठरवलं. आणि ख्वाडा या सिनेमाच लिखाण पुर्ण झालं. हा सिनेमा एक सामाजीक विषयावर असल्यान कोणताच चित्रपट निर्माता भाऊसाहेबांना समोर उभा करत नव्हता. वर्षभर अनेक निर्मात्यांशी त्यांच बोलण झाल पण सगळ्याच निर्मात्यांनी त्यांना नकार दिला. आपल्या सिनेमाला निर्माता मिळत नसल्यान. वर्षानंतर त्यांनी ठरवलं आपली स्वताची पाच एकर बागायती जमीन विकायची आणि सिनेमा करायचा. जमिन विकायला सुरुवातीला आई आणि भावाने विरोध केला. काम केल तरच खायला मिळेल अश्या सर्वसामान्य शेतकर्याची परिस्थीती जशी असते तशीच भाऊसाहेबाच्या घरची होती. या परिस्थीतीतून आपण बाहेर पडलो तर चांगली प्रगती करु शकतो. असे भावाला समजवून सांगीतल. त्यानंतर घरच्यांनी हि भाऊच सिनेमा बनवण्याच स्वप्न सत्यात उतरण्यासाठी मोलाची साथ दिली. जमीन विकण्याचा निर्णय घेतला. आणि ख्वाडा पुर्ण झाला. लहानपणी दुर्बीणिच्या भिंगातून चार आठ आणे घेऊन चित्र दाखवणार्या भाऊसाहेबाने ख्वाडा सिनेमा ज्यांच्यामुळे पुर्ण केला, ती आपली आई आणि भावाला सिनेमाच फस्ट स्क्रिनींग दाखवल. तो सिनेमा पाहिल्यावर जो मार्ग तु निवडलास तो योग्य होता. जमिन विकूण सिनेमा बनवलास त्यातून कसदार सोन तयार झालय अश्या प्रतीक्रिया आई आणि भावाच्या होत्या. ख्वाडा या सिनेमाला अनेक राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेत. भारताचा 2015 चा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार हि या सिनेमान पटकवलाय. ख्वाडा म्हणजे अडथळा. हा सिनेमा बनवताना अनेक असे अडथळे भाऊसाहेब क-हाडे यांना आले. पण त्यांना न जुमानता सगळे अडथळे पार करत त्यांनी ख्वाडाची निर्मीती केली. के.प्रफुल्ल

Tuesday, 15 December 2015

लेखक की देशद्रोही

लेखक हो लोकप्रतीनिधी विरोधी काही लिहू नका. नाहीतर तुम्ही देशद्रोही व्हालं. चित्रकार हो तुम्हीही नेत्यांची कार्टुन चित्र काढू नका. नाहीतर तुम्हीही देशद्रोही बनाल. विचारवंतहो तुम्ही एक शब्द ही बोलू नका. नाहीतर तुम्हाला पण देशद्रोहाच्या नावावर जेलमध्ये जाव लागेल. आणि मतदार हो अच्छे दिन येतील ही आशा बाळगुण मतदान केलतं ना? आता अच्छे दिन येवोत अगर न येवोत. फक्त बघत रहा. तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतीनीधी विषयी काय बोलू नका बर का नाहीतर तुमचा लोकप्रतीनीधीच तुम्हाला जेलमध्ये पाठवेल. स्वतंत्रपणे लिहीनं, मुक्तपणे बोलणं, निर्भीडपणे आपले विचार मांडण हे होतं तुमचं संविधानाने दिलेल अभिव्यक्ती स्वातंत्र्य आता तेच काढून घेतलं. आता काय करणार? मागच्याच महिण्यात थाटामाटात 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला. पण आम्हाला स्वातंत्र्य मिळाल का? अहो तुम्हाला कधीच स्वातंत्र्य मिळालं नाही. स्वातंत्र्य म्हणून बघण्याचा चष्मा काढून टाका आधी. जेवढं इंग्रजांच्या काळात इंग्रजांच्या पारतंत्र्यात होता. तेवढचं आताही तुम्ही पारतंत्र्यातच आहात. अंन्यायाला विरोध करणारी गाणी लिहीणं, म्हणनं म्हणजे नक्षलवादी. आणि आता लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतीनीधीला लोकांनी काही बोललं तर देशद्रोह. मतदार हो तुम्ही तुमच्या लोकप्रतीनीधीकडून विकासाच्या काही अपेक्षा ठेवल्या असल्या तर त्या केवळ अपेक्षाच राहूद्या. तुमची जर अपेक्षा पुर्ण झाली नाही तर काही बोलू नका हो नाहीतर तुम्हीही देशद्रोह्यांच्या यादित गणला जाल. - के.प्रफुल्ल