लेखक हो लोकप्रतीनिधी विरोधी काही लिहू नका. नाहीतर तुम्ही देशद्रोही व्हालं.
चित्रकार हो तुम्हीही नेत्यांची कार्टुन चित्र काढू नका. नाहीतर तुम्हीही देशद्रोही बनाल.
विचारवंतहो तुम्ही एक शब्द ही बोलू नका. नाहीतर तुम्हाला पण देशद्रोहाच्या नावावर जेलमध्ये जाव लागेल.
आणि मतदार हो अच्छे दिन येतील ही आशा बाळगुण मतदान केलतं ना? आता अच्छे दिन येवोत अगर न येवोत. फक्त बघत रहा. तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतीनीधी विषयी काय बोलू नका बर का नाहीतर तुमचा लोकप्रतीनीधीच तुम्हाला जेलमध्ये पाठवेल.
स्वतंत्रपणे लिहीनं, मुक्तपणे बोलणं, निर्भीडपणे आपले विचार मांडण हे होतं तुमचं संविधानाने दिलेल अभिव्यक्ती स्वातंत्र्य आता तेच काढून घेतलं. आता काय करणार?
मागच्याच महिण्यात थाटामाटात 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला. पण आम्हाला स्वातंत्र्य मिळाल का? अहो तुम्हाला कधीच स्वातंत्र्य मिळालं नाही. स्वातंत्र्य म्हणून बघण्याचा चष्मा काढून टाका आधी. जेवढं इंग्रजांच्या काळात इंग्रजांच्या पारतंत्र्यात होता. तेवढचं आताही तुम्ही पारतंत्र्यातच आहात.
अंन्यायाला विरोध करणारी गाणी लिहीणं, म्हणनं म्हणजे नक्षलवादी.
आणि आता लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतीनीधीला लोकांनी काही बोललं तर देशद्रोह.
मतदार हो तुम्ही तुमच्या लोकप्रतीनीधीकडून विकासाच्या काही अपेक्षा ठेवल्या असल्या तर त्या केवळ अपेक्षाच राहूद्या. तुमची जर अपेक्षा पुर्ण झाली नाही तर काही बोलू नका हो नाहीतर तुम्हीही देशद्रोह्यांच्या यादित गणला जाल.
- के.प्रफुल्ल
No comments:
Post a Comment