एखाद्या व्यक्तीच उदिष्ट निश्चित असेल. तर त्या उदिष्टा पर्यंत पोहचण्यासाठी ती व्यक्ती जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मधे येणारे सगळे अडथळे पार करते. आणि आपल्या उदिष्टा पर्यंत पोहचते. त्यातलच एक उत्तम उदाहरण म्हणजे दिग्दर्शक भाऊराव क-हाडे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या हिंगणी या खेडेगावात जन्मलेल्या भाऊसाहेब क-हाडे यांच लहान पनापासुन सिनेमा बनवण्याच स्वप्न होत. सिनेमाच वेड असलेल्या भाऊसाहेबाची घरची परिस्थी बेताची होती. त्या काळी गावात एकच टिव्ही असल्यान गावातली सगळी मंडळी दुरदर्शनवरचा सिनेमा पहायला एकाच ठिकाणी यायची. वयाच्या सहाव्या वर्षी मैने प्यार किया हा सलमान खानचा पहिला चित्रपट भाऊसाहेबानी पाहीला होता. आणि तीथूनच सिनेमा बनवण्याच स्वप्न त्यांनी उराशी बाळगल होत. त्यानंतर दुरदर्शनवर लागणारे सगळे सिनीमे ते पहात होते.
गावातच चैथी पर्यंतच शिक्षण घेऊन पुढच्या शिक्षणाला त्यांना शिरुरला जाव लागलं. पाचवीत शिरुरच्या विद्याधाम प्रशाला हायस्कुलला प्रवेश घेतला. पण सिनेमा विषयीच प्रेम त्यांना स्वस्थ बसु देत नव्हत. जेव्हा जेव्हा नवा सिनेमा येईल तेव्हा तेव्हा शाळा चुकवून शिरुरच्या मिनी थिअटर्सला तीन चार रुपये देऊन सिनेमा पहायला जायचे.
सिनेमा बनवन्यासाठी कथेची गरज असते. आणि कथा लिहीन्यासाठी वाचनाची गरज असते. हे त्यांना माहीत होत. शिरुरला शिकत असताना पाचवी ते दहावी पर्यंत शाळेतल्या ग्रंथालयातील अनेक पुस्तके, कथा, कादंबरी यांच वाचन त्यांनी केल. आणि दहावी नंतर कविते पासुन लिखाणाची सुरुवात केली. आकरावीत शिकत असताना दिग्दर्शक व्हायच हे ठाम ठरवलं होत. दिग्दर्शनाच वेड असलेले भाऊसाहेब घरच्या कामात हि पटाईत होते.
एकदा शेतातला कांदा विकायला पुण्याला गेले. पुण्यच्या गुलटेकडीवर गोडावून मध्ये रात्री मुक्काम केला. काद्याच्या गोण्यांवर आख्खी रात्र झोपुन काढली. दुसर्या दिवशी सकाळी गोडावून मालकाकडून उच्चल घेतली. गोडावूनच्या बाजूला असलेल्या एका हॉटेलमध्ये तोंड धुवून चहा नाष्टा केला. आणि घरी जाता जाता पुण्याच्या FTI
(फिल्म अॅण्ड टेलिव्हीजन इन्स्टीट्यूट) मध्ये अॅडमिशन साठी चौकशी करण्यासाठी जायच त्यांनी ठरवल होत. FTI हे एक सिनेमा बनवण्याच प्रशिक्षण देणार इन्स्टीट्यूट आहे. हे त्यांनी वर्तमान पत्रात वाचलं होत. आपल्याला ही दिग्दर्शनाचे धडे या इंन्स्टीट्यूट मध्ये मिळू शकतात. हे समजल्यावर अॅडमीशनची चौकशी करण्यासाठी FTI च्या गेट वर गेले. त्यांनी अॅडमिशनची विचारपुस केली असता, गेटच्या गार्डने त्यांना मळलेल्या कपड्यात डोक्यापासुन पायापर्यंत न्याहळले. आणि अॅडनिशनसाठी ग्रॅज्यूएशन असावे लागते हे सांगीतले. त्यावेळी भाऊसाहेबांच ग्रॅज्यूएशन पुर्ण नसल्यान ते अॅडमिशन घेऊ शकले नाहीत. त्यानंतर मराठी विषयातून त्यांनी आपलं ग्रॅज्यूएशन पुर्ण केल. नंतर FTI ला अॅडमिशन घेण्याचा प्रयत्न केला पण इग्रजी कच्च असल्यांन तो हि प्रयत्न निष्फळ ठरला.
ग्रॅज्यूएशन पुर्ण झाल्यावर सिनेमासृष्टीच्या माहेर घरी म्हणजे मुंबईला कम्युनिकेशन स्टडीजला त्यांनी अॅडमिशन घेतलं. त्या ठिकाणी समर नखाते सर यांच्याकडे ते सिनेमा शिकले. आणि इथून सुरुवात झाली एका ध्येयवेड्या दिग्दर्शकाची कहाणी.
सिनेमा करायचा हे निश्चित ठरवल होत. पण कोणत्या विषयावर सिनेमा करायचा हे माहीत नव्हत. खोलवर जाऊन विचार न करता अवती भोवती असणार्या समस्या त्या समस्यांचे प्रश्न मांडणारा सिनेमा बनवायचं ठरवलं. आणि ख्वाडा या सिनेमाच लिखाण पुर्ण झालं. हा सिनेमा एक सामाजीक विषयावर असल्यान कोणताच चित्रपट निर्माता भाऊसाहेबांना समोर उभा करत नव्हता. वर्षभर अनेक निर्मात्यांशी त्यांच बोलण झाल पण सगळ्याच निर्मात्यांनी त्यांना नकार दिला. आपल्या सिनेमाला निर्माता मिळत नसल्यान. वर्षानंतर त्यांनी ठरवलं आपली स्वताची पाच एकर बागायती जमीन विकायची आणि सिनेमा करायचा.
जमिन विकायला सुरुवातीला आई आणि भावाने विरोध केला. काम केल तरच खायला मिळेल अश्या सर्वसामान्य शेतकर्याची परिस्थीती जशी असते तशीच भाऊसाहेबाच्या घरची होती. या परिस्थीतीतून आपण बाहेर पडलो तर चांगली प्रगती करु शकतो. असे भावाला समजवून सांगीतल. त्यानंतर घरच्यांनी हि भाऊच सिनेमा बनवण्याच स्वप्न सत्यात उतरण्यासाठी मोलाची साथ दिली. जमीन विकण्याचा निर्णय घेतला. आणि ख्वाडा पुर्ण झाला. लहानपणी दुर्बीणिच्या भिंगातून चार आठ आणे घेऊन चित्र दाखवणार्या भाऊसाहेबाने ख्वाडा सिनेमा ज्यांच्यामुळे पुर्ण केला, ती आपली आई आणि भावाला सिनेमाच फस्ट स्क्रिनींग दाखवल. तो सिनेमा पाहिल्यावर जो मार्ग तु निवडलास तो योग्य होता. जमिन विकूण सिनेमा बनवलास त्यातून कसदार सोन तयार झालय अश्या प्रतीक्रिया आई आणि भावाच्या होत्या.
ख्वाडा या सिनेमाला अनेक राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेत. भारताचा 2015 चा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार हि या सिनेमान पटकवलाय. ख्वाडा म्हणजे अडथळा. हा सिनेमा बनवताना अनेक असे अडथळे भाऊसाहेब क-हाडे यांना आले. पण त्यांना न जुमानता सगळे अडथळे पार करत त्यांनी ख्वाडाची निर्मीती केली.
के.प्रफुल्ल
No comments:
Post a Comment