माणूस आणि प्राणी यांचे नातेसंबध सागंणारा सिनेमा भारतीय चित्रपटसृष्ठीला नवा नाहीय.
भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतातल्या बर्याच ठिकाणी पारंपारिक पध्दतीने शेती केली जाते. शेतीेेच्या मशागतीसाठी आजही बैल जोडीचा वापर केला जातो. म्हणून शेतकरी आणि बैल हे एक अतूट समीकरण बनलयं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रसाद नामजोशी याचा नुकताच प्रदर्शीत झालेला रंगा पतंगा.
रगा पतंगा ही नावं एैकुण कोणत्या तरी व्यक्तीची असावीत अस वाटनं सहाजीक आहे. पण रंगा पतंगा हे नाव व्यक्तीच नसुन ते एका बैलाच्या जोडीचं आहे. विदर्भातल्या जूम्मन म्हणजे मकरंद अनासपुरे या मुस्लिम शेतकर्याची बैल जोडी अचानक रात्रीत गायब होते. बैलं शोधण्यासाठी जूम्मन आणि त्याचा मित्र पोपट म्हणजे संदिप पाठक यांनी केलेला प्रवास या सिनेमात चित्रीत केला आहे.
एकीकडे महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतोय. जनावरांना चारा मिळतं नसल्यानं शेतकरी जनावर खाटीकाला विकताेय. तर दुसरीकडं स्व:ताच्या मुलासारखा सांभाळ केलेले बैल अचानक गायब होतात. हरवलेले बैल कुठे शोधावेत. यासाठी जुम्मन पोलीस स्टेशन मध्ये कंम्प्लेंट करायला जातो. हरवलेली माणसं सापडतं नाहीत, तर तुझी बैलं कुठ सापडणार असं बोलून जूम्मनला पोलिस स्टेशन मधून हाकलून दिल जातं. पोपटच्या सांगण्यावरुन जूंम्मन बैल शोधण्यासाठी जोशी बुवांकडे ज्योतीषी पहायला जातो. आणि एकविसाव्या शतकात असलेली अंधश्रध्दा अजून ही खेड्या पाड्यात तशीच आहे असं दिसुन येतं. जोशी बुवांच्या सांगण्यावरुन जूंम्मन आणि पोपट बैलांचा शोध घेतं असताना. जूम्मन मुस्लिम तर त्याचे बैल ही मुस्लिमचं. जोशी बुव्वा जुम्मनचे बैलं कुठ आहेत हे कसे काय सांगू शकतील? असा प्रश्न एक वाटाड्या उपस्थित करतो. गाईचा धर्म दुध देनं आणि शेतात काबाड कष्ट करनं हा बैलाचा धर्म. त्याला तर सुखांन जगू द्या. जूंम्मन ने दिलेल हे उत्तर सध्या चाललेल्या हिंदू मुस्लिम गो हत्या वादाला मार्मिक म्हणायला काहीच हरकत नाही.
बैलाची शोधाशोध सुरु असतानाच दुष्काळाची न्यूज कवर करण्यासाठी सिनेमात इलेक्ट्रॉनिक मिडीयांची इंट्री अगदी सहज होते. पोपट जूम्मनची बैलं गायब झाल्याची घटना पत्रकारांना सांगतो. आणि तिथून जूंम्मनचे बैल गायब झाल्याची घटना मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन पोहचते. आता मिडीया ही जूम्मनचे रगा पतंगा शोधण्यासाठी पुढे आलीय. जूम्मनचे बैल गायब झाल्याची घटना नवी नाहीय तर या आधी बरेच बैल गायब होण्याच्या घटना विदर्भात जघडल्या आहेत अस समोर येतं. शेवटच्या टप्यात हैद्राबादला कत्तलीसाठी जाणारा बैलांनी भरलेला ट्रक पोलीसांना सापडतो. आणि बैल गायब होण्याचा छडा लागतो. बैलाने भरलेला ट्रक पाहून जूम्मन सुखावतो. त्याचे रंगा पतंगा या ट्रक मध्ये असतील याचा आनंद त्याच्या चेहर्यावर जाणवतो. पण हा आनंद क्षणीक असतो. कारण जूम्मनचे रंगा पतंगा या ट्रक मध्ये नसतात. हैद्राबादला बैल कंत्तलीसाठी जातात. हे एैकल्यावरचं जूंम्मन खचून जातो. आपल्या रंगा पतंगाच काय झालं असेल? कुठ असतील रंगा पतंगा? या विचारात आडकतो. आणि स्व:ता रंगा पतंगाचा शोध हैद्राबादला जायला निघतो. हैद्राबादला निघाल्यावर जूम्मंन वाटेत एका टपरीवर चहासाठी थांबतो. त्यावेळी एका ट्रक ड्रायव्हरचं त्याच्या सोबतीशी चाललेल बोलनं एैकतो. तो ट्रक हैद्राबादला निघालेला असतो. त्यामध्ये जनावर आहे हे समजताच जूंम्मन समोर उभा असलेल्या ट्रक मध्ये बघतो, तर त्याला त्याचे रंगा पतंगा दिसतात. आणि रंगा पतंगाला शोधण्याचा प्रवास इथचं थांबतो. शेवटच्या सिन मध्ये हरवलेले रंगा पतंगा सापडल्यावर जूम्मनच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून येतात. तर पंत्रकार अभय महाजनच्या चेहर्यावर केलेल्या कामाचं समाधान मिळाल्याचं दिसुन येतं.
एकूणच रंगा पतंगाला पाहण्यासाठी संपुर्ण चित्रपट शेवट पर्यंत खेळवून ठेवतो.
मकरंद अनासपुरे आणि संदिप पाठक यांची मुख्य भुमिका असलेल्या या सिनेमात नंदिता धुरी, सुहास पळशीकर, भारत गणेशपुरे, गौरी कोंगे, अभय महाजन, हार्दीक जोशी यांच्याही महत्वाच्या भुमीका आहेत. आणि त्यांच काम ही कौतुकास्पद आहे. या सिनेमातलं संगीत सिनेमाला सोबर असं आहे. आदर्श शिंदे यानी गझलं पहिल्यांदा जरी म्हटली असली तरीही तशी वाटतं नाहीय. पुन्हा पुन्हा सिनेमात हवी हवीशी वाटते.
ये सनम आखों को मेरी खुबसुरत साज दे.
येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे.
के.प्रफुल्ल