कोपर्डी बलात्कार प्रकरणानंंतर महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला. मराठा क्रांती मुक मोर्चा या नावाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने मोर्चे निघाले. "एक मराठा लाख मराठा" म्हणतं कोपर्डी बलात्कार प्रकरणी "नराधमांना फाशीची शिक्षा द्या" असा जनरेटा गावा गावातून येत होता. 28 सप्टेंबर ला सांगलीत ही मोठा मोर्चा निघाला होता. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लहान, थोर, तरुण, तरुणी, महिला, पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते.
कोपर्डी प्रकरणाच्या निषेधार्थ सांगलीत निघालेल्या मोर्चा नंतर सहा जानेवारीला याच जिल्ह्यात भिलवडी जवळ असलेल्या माळवाडी या गावात अल्पवयीन मुलीचा बलात्कार होऊन खून झाल्याची घटना समोर आली. या घटनेने गावासोबत सागंली जिल्हा हादरुन गेला होता. भिलवडी माळवाडी सारख्या उच्चभ्रू, सुशिक्षीत भागात अशी घटना घडणं म्हणजे लांच्छनास्पद होतं.
बलात्काराची घटना समजल्यावर भिलवडी, माळवाडी तसेच आसपासच्या गावांनी या घटनेच्या निषेधार्थ गावं बंदची घोषणा केली. काही वेळात अासपासची गावं बंद झालीत. वॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून आसपासच्या शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. याच दरम्यान अफवांच उकळ फुटलेल होतं. घटनेची काहीच माहीती नसताना कोणीही काहीही अफवा पसरवत होतं. आरोपी दलित किंवा मुस्लिम असल्याच्या पोस्ट सोशल मिडीयावर पसरवत होत्या.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सात तारखेला भिलवडीत विविध सामाजीक संघटनांनी कँडल मार्च चं नियोजन केलं होतं. या मार्च मध्ये गावातल्या सगळ्या महिला पुरुषांनी सक्रिय सहभाग घ्यावा म्हणून रिक्षातून फिरुन पुकारलं जातं होतं. भिलवडीतल्या दलित वस्तीत येऊन बाबासाहेबांची शंपथ देऊन कँडल मार्च मध्ये सहभागी होण्यास सांगीतलं जात होतं. (खर तर त्यांना बाबासाहेबांची शपथ द्यायची गरज का लागली होती. याचं कारण अजून लक्षात येत नाहीय. दलित स्त्रीया बाकीच्या स्त्रीयांपेक्षा वेगळ्या आहेत का? आजवर दलित स्त्रीयांवर अत्याच्यार झाला नाही का? देशात बलात्कारांसारख्या घटना बौध्द वस्त्यात झालेल्या नाहीत का? बलात्कार करुन त्याचा खुन झालेल्या घटना त्यांनी एैकल्या, पाहील्या नाहीत का? एका मुलीवर अमानुष अत्याच्यार झाल्याचा दलित स्त्रीयांना काहीच फरक पडणार नाही. कारण ती परजातीची आहे. त्यांना अस म्हणायचं असेल का?) असो...
पिडीत मुलीला अभिवादन आणि घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सात तारखेला सायंकाळी भिलवडीत कँडल मार्च निघाला. त्यात भिलवडी गावासह आसपासच्या गावातील महिला, पुरुष, तरुण, तरुणीनी (दलीत महिला, पुरुष, तरुण, तरुणी सह) सक्रीय सहभाग घेतला होता. हि घटना समोर आल्यापासुन पोलीस तपास यंत्रणा कामाला लागली होती. ज्या ठिकाणी मुलीचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी असलेल्या चोपडे गोडाऊनमध्ये रोज काही संशयीतांना ताब्यात घेतलं जायचं आणि विचारपुस करुण सोडून दिलं जायचं. तिन चार दिवसात भिलवडी आणि परीसरातल्या दोनशे संशयीतांना ताब्यात घेतलं होतं. माळवाडी प्रकरण सोशल मिडीया, वर्तमानपत्र आणि टि व्ही न्यूज मुळे आता महाराष्ट्रभर गाजत होतं. बरेचसे राजकीय पुढारी मुलीच्या घरी सांत्वनाला येेत होते. जसं पुढारी येऊ लागले तसं पोलीसांवरचा दबाव वाढतं होता. लवकरात लवकर या घटनेचा आरोपी गजाआड दिसेल. असं आश्वासन प्रत्येक पुढारी देत होता. सत्येत असलेल्या राजकीय पक्षावर विरोधी पक्षातले नेते आणि काही संघटना ताषेरे ओढत होते.
पोलीस तपास यंत्रणा आता दिवस रात्र कामाला लागली होती. भिलवडी ते तासगाव आणि भिलवडीतून महत्वाच्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावर महत्वाच्या ठिकाणी असणारे सी सी टी व्ही फुटेज तपासत होती. रात्रभर पोलीस वॅन भिलवडी आणि परीसरात फिरत होत्या. घटनेला पाच दिवस उलटून गेले होते. आरोपी अजूनही मोकाटचं होता. कोणताच पुरावा सापडतं नसल्यानं पोलीसांंनी शे-दोनशे लोकांना चौकशी करुन सोडून दिलं होतं. पण पाच दिवसानंतर आरोपी पकडला असून तो लवकरचं जनते समोर येणार आहे. अशी बातमी पसरली. आरोपी कोण आहे. हे जाणून घ्यायला गावाची उत्कंठा वाढली होती.
ज्या दिवशी आरोपी जाहीर करणार होते त्या दिवशी सकाळ पासुन भिलवडी पोलीस स्टेशन बाहेर तुफान गर्दी झालेली होती. आरोपी कोण असेल? किती असतील? आरोपी आपल्या गावातलाचं आहे की परगावचा? असे बरेच प्रश्न त्या परीसरातल्या लोकांच्या डोक्यात घोंगावत होते. पोलीसानी जवळपास दोनशे संशयीतांची चौकशी करुन सहा दिवसानंतर आरोपीचा छडा लागला असून लवकरच जनते समोर येईल. अशी ग्वाही पत्रकार परीषदेत दिली होती. त्यानंतर दोन दिवसात म्हणजे 14 जानेवारीला आरोपी घोषीत केला गेला. त्या दिवशीच्या पत्रकार परीषदेत प्रशांत सोगटे हे आरोपीचं नाव जाहीर केलं. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात, टि. व्ही. बातम्यामध्ये प्रशांतच्या फोटो सह "आठ दिवसात मुसक्या आवळल्या" या हेडलाईनची बातमी महाराष्ट्रभर पोहचली. प्रशांत सोगटे हे नाव माझ्यासाठी आणि बऱ्याच लोकांसाठी नविन होतं. नविन एवढ्या साठीचं होतं की प्रशांत सोंगटेला हिमेश म्हणून ओळखलं जात होतं. त्याच्या प्रशांत सोंगटे या नावाशी जास्त जवळीकता कधी आली नव्हती. त्याचा वर्तमान पत्रातला फोटो पाहून माझीच मला किव वाटू लागली. कारण वर्तमान पत्रात आलेला फोटो मीच माझ्या एक पत्रकार मित्राला दिला होता.
अनेकदा आरोपी पकडला तर "तो खरचं आरोपी असेल. त्यानेच हे कृत्य केलं असेल. त्याला फाशीची शिक्षा व्हावी.'' असं खुप वेळा लोकांना म्हणताना मी पाहिल होतं. पण प्रशांतच्या बाबतीत मात्र असं झालं नव्हतं. जेंव्हा प्रशातला आरोपी म्हणून जाहीर केलं होतं, तेंव्हा लोकं चिंतेत पडले होते. प्रशांतवर अंन्याय होतोय हे सरळ सरळ लोकांना दिसतं होतं. पोलीस यंत्रणेवरवरचा विश्वास नसल्याचं वातावरण पसरलं होतं. पण पोलिसांसमोर बोलण्याचं, ना त्यांना विचारण्याचं धाडस लोकांमध्ये नव्हतं. प्रशांत आरोपी असनं शक्य वाटत नव्हतं. त्याला बरीचशी कारणं देखील होती. ती कारणं सर्वसांमान्याच्या लक्षात ही येत होती.
ती कारणं अशी होती. शवविच्छेदनाच्या अहवालात बलात्कार सामुहीक असल्याच सांगण्यात आलं होतं. मग एकट्या प्रशांतला आरोपी कसा घोषीत केला? बाकीच्या आरोपींना का पकडलं गेलं नाही? त्या आरोपींना राजकीय पाठबळ मिळतय का? आरोपी घोषीत केला. तर मग बलात्कार आणि हत्तेचा घटनाक्रम का जाहीर केला गेला नव्हता? बलात्कार केलेल्या अंतरापासुन मृतदेह सापडलेले अंतर जर दोन किलोमिटर असेल, तर एकट्या आरोपीने तो मृतदेह दोन किलोमीटर कसा आनला असेल? सी सी टी व्ही मध्ये दिसणारी संशयीत रिक्षा आणि रिक्षाचालक यांना अजून ताब्यात का घेतलं नाहीय? जर घोषीत केलेल्या आरोपीने म्हणजे प्रशांतने बलात्कार करुन खुन केला होता. तर तो कँन्डल मार्चला का हजर होता? त्याचा मनात कसलीच भिती नव्हती का? किवा बलात्कार करुण खुन केल्यावर तो पळून का गेला नाही? प्रशांतला दोन ते तीन वेळा चौकशीसाठी ताब्यात घेऊन पुन्हा सोडून दिलं होतं. त्यावेळी त्याने पलायन का केले नाही? दोनशे संशयीतांच्या चौकशीत सामुहीक बलात्काराच्या घटनेत फक्त एकच आरोपी असु शकतो का? प्रशांत हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. या अगोद ही त्याच्यावर दोन खटले चालू होतेे. म्हणून हे क्रुर कृत्य त्यानेच केले असेल का? असे प्रश्न लोकांना पडतं होते.
पोलीसांनी प्रशांतला न्यायालयात हजर केले. न्यायालयाकडून आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलीसांनी प्रशांतला अटक केल्यापासुन त्याचा भाऊ आणि वडिल रोज त्याला भेटायला जायचे. त्यावेळी तो वडिलांना म्हणायचा, "मी काहीच केलं नाही. तुंम्ही माझी काळजी करु नका. मी दोषी नाही. यांनी मला मारुन जरी टाकलं तरीही मी गुंन्हा कबुल करणार नाही. जो गुंन्हा मी केलाचं नाही तर का कबूल करायचा?" भावाला सांगायचा "काळजी घे आई पप्पाची." प्रत्येक भेटीच्या वेळेस सतत न घाबरता तो हेच बोलायचा. प्रशांतला ठोस पुरावा नसताना आरोपी म्हणून का घोषीत केला असेल? त्याचं कुटूंब परगावहून कामधंद्यासाठी माळवाडीत स्थलांतर झाल्यामुळे त्याच्या पाठीमागे कोणीही नाही म्हणून? राज्यातलं वातावरण कोपर्डी घटनेमुळे गढूळ झालेलं आणि पुन्हा या घटनेनं सामाजीक वातावरण दुषीत होऊ नये म्हणून? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडनुका तोंडावर आल्या होत्या. निवडणुकीवर काही दुष्परिणाम होऊ नये म्हणून पोलिसांना प्रशांतला आरोपी घोषीत करावा लागला? काहीचं कळतं नाही. पण एखाद्या निर्दोष व्यक्तीला मृत्यूच्या दाढेत उभं करणं चांगली गोष्ट आहे का? ज्यावेळी त्याला आरोपी घोषीत केला तेंव्हा त्याची आणि त्याच्या कुटूंबाची काय अवस्था झाली असेल? त्याला लोखंडी गजाआड पाहून त्याच्या आईची, वडिलाची अवस्था काय झाली असेल? घटना घडण्या अगोदर त्याच्या कुटूंबाचं असणारं सामाजीक स्थान असचं कायम अबाधीत राहील का? त्याच्यावर आणि त्याच्या कुटूंबावर बलात्काराचा पडलेला हा शिक्का समाज पुसून टाकेल का? आपला समाज एवढा सुसंस्कृत आहे का?
- के.प्रफुल्ल
कोपर्डी प्रकरणाच्या निषेधार्थ सांगलीत निघालेल्या मोर्चा नंतर सहा जानेवारीला याच जिल्ह्यात भिलवडी जवळ असलेल्या माळवाडी या गावात अल्पवयीन मुलीचा बलात्कार होऊन खून झाल्याची घटना समोर आली. या घटनेने गावासोबत सागंली जिल्हा हादरुन गेला होता. भिलवडी माळवाडी सारख्या उच्चभ्रू, सुशिक्षीत भागात अशी घटना घडणं म्हणजे लांच्छनास्पद होतं.
बलात्काराची घटना समजल्यावर भिलवडी, माळवाडी तसेच आसपासच्या गावांनी या घटनेच्या निषेधार्थ गावं बंदची घोषणा केली. काही वेळात अासपासची गावं बंद झालीत. वॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून आसपासच्या शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. याच दरम्यान अफवांच उकळ फुटलेल होतं. घटनेची काहीच माहीती नसताना कोणीही काहीही अफवा पसरवत होतं. आरोपी दलित किंवा मुस्लिम असल्याच्या पोस्ट सोशल मिडीयावर पसरवत होत्या.
पिडीत मुलीला अभिवादन आणि घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सात तारखेला सायंकाळी भिलवडीत कँडल मार्च निघाला. त्यात भिलवडी गावासह आसपासच्या गावातील महिला, पुरुष, तरुण, तरुणीनी (दलीत महिला, पुरुष, तरुण, तरुणी सह) सक्रीय सहभाग घेतला होता. हि घटना समोर आल्यापासुन पोलीस तपास यंत्रणा कामाला लागली होती. ज्या ठिकाणी मुलीचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी असलेल्या चोपडे गोडाऊनमध्ये रोज काही संशयीतांना ताब्यात घेतलं जायचं आणि विचारपुस करुण सोडून दिलं जायचं. तिन चार दिवसात भिलवडी आणि परीसरातल्या दोनशे संशयीतांना ताब्यात घेतलं होतं. माळवाडी प्रकरण सोशल मिडीया, वर्तमानपत्र आणि टि व्ही न्यूज मुळे आता महाराष्ट्रभर गाजत होतं. बरेचसे राजकीय पुढारी मुलीच्या घरी सांत्वनाला येेत होते. जसं पुढारी येऊ लागले तसं पोलीसांवरचा दबाव वाढतं होता. लवकरात लवकर या घटनेचा आरोपी गजाआड दिसेल. असं आश्वासन प्रत्येक पुढारी देत होता. सत्येत असलेल्या राजकीय पक्षावर विरोधी पक्षातले नेते आणि काही संघटना ताषेरे ओढत होते.
पोलीस तपास यंत्रणा आता दिवस रात्र कामाला लागली होती. भिलवडी ते तासगाव आणि भिलवडीतून महत्वाच्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावर महत्वाच्या ठिकाणी असणारे सी सी टी व्ही फुटेज तपासत होती. रात्रभर पोलीस वॅन भिलवडी आणि परीसरात फिरत होत्या. घटनेला पाच दिवस उलटून गेले होते. आरोपी अजूनही मोकाटचं होता. कोणताच पुरावा सापडतं नसल्यानं पोलीसांंनी शे-दोनशे लोकांना चौकशी करुन सोडून दिलं होतं. पण पाच दिवसानंतर आरोपी पकडला असून तो लवकरचं जनते समोर येणार आहे. अशी बातमी पसरली. आरोपी कोण आहे. हे जाणून घ्यायला गावाची उत्कंठा वाढली होती.
ज्या दिवशी आरोपी जाहीर करणार होते त्या दिवशी सकाळ पासुन भिलवडी पोलीस स्टेशन बाहेर तुफान गर्दी झालेली होती. आरोपी कोण असेल? किती असतील? आरोपी आपल्या गावातलाचं आहे की परगावचा? असे बरेच प्रश्न त्या परीसरातल्या लोकांच्या डोक्यात घोंगावत होते. पोलीसानी जवळपास दोनशे संशयीतांची चौकशी करुन सहा दिवसानंतर आरोपीचा छडा लागला असून लवकरच जनते समोर येईल. अशी ग्वाही पत्रकार परीषदेत दिली होती. त्यानंतर दोन दिवसात म्हणजे 14 जानेवारीला आरोपी घोषीत केला गेला. त्या दिवशीच्या पत्रकार परीषदेत प्रशांत सोगटे हे आरोपीचं नाव जाहीर केलं. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात, टि. व्ही. बातम्यामध्ये प्रशांतच्या फोटो सह "आठ दिवसात मुसक्या आवळल्या" या हेडलाईनची बातमी महाराष्ट्रभर पोहचली. प्रशांत सोगटे हे नाव माझ्यासाठी आणि बऱ्याच लोकांसाठी नविन होतं. नविन एवढ्या साठीचं होतं की प्रशांत सोंगटेला हिमेश म्हणून ओळखलं जात होतं. त्याच्या प्रशांत सोंगटे या नावाशी जास्त जवळीकता कधी आली नव्हती. त्याचा वर्तमान पत्रातला फोटो पाहून माझीच मला किव वाटू लागली. कारण वर्तमान पत्रात आलेला फोटो मीच माझ्या एक पत्रकार मित्राला दिला होता.
अनेकदा आरोपी पकडला तर "तो खरचं आरोपी असेल. त्यानेच हे कृत्य केलं असेल. त्याला फाशीची शिक्षा व्हावी.'' असं खुप वेळा लोकांना म्हणताना मी पाहिल होतं. पण प्रशांतच्या बाबतीत मात्र असं झालं नव्हतं. जेंव्हा प्रशातला आरोपी म्हणून जाहीर केलं होतं, तेंव्हा लोकं चिंतेत पडले होते. प्रशांतवर अंन्याय होतोय हे सरळ सरळ लोकांना दिसतं होतं. पोलीस यंत्रणेवरवरचा विश्वास नसल्याचं वातावरण पसरलं होतं. पण पोलिसांसमोर बोलण्याचं, ना त्यांना विचारण्याचं धाडस लोकांमध्ये नव्हतं. प्रशांत आरोपी असनं शक्य वाटत नव्हतं. त्याला बरीचशी कारणं देखील होती. ती कारणं सर्वसांमान्याच्या लक्षात ही येत होती.
ती कारणं अशी होती. शवविच्छेदनाच्या अहवालात बलात्कार सामुहीक असल्याच सांगण्यात आलं होतं. मग एकट्या प्रशांतला आरोपी कसा घोषीत केला? बाकीच्या आरोपींना का पकडलं गेलं नाही? त्या आरोपींना राजकीय पाठबळ मिळतय का? आरोपी घोषीत केला. तर मग बलात्कार आणि हत्तेचा घटनाक्रम का जाहीर केला गेला नव्हता? बलात्कार केलेल्या अंतरापासुन मृतदेह सापडलेले अंतर जर दोन किलोमिटर असेल, तर एकट्या आरोपीने तो मृतदेह दोन किलोमीटर कसा आनला असेल? सी सी टी व्ही मध्ये दिसणारी संशयीत रिक्षा आणि रिक्षाचालक यांना अजून ताब्यात का घेतलं नाहीय? जर घोषीत केलेल्या आरोपीने म्हणजे प्रशांतने बलात्कार करुन खुन केला होता. तर तो कँन्डल मार्चला का हजर होता? त्याचा मनात कसलीच भिती नव्हती का? किवा बलात्कार करुण खुन केल्यावर तो पळून का गेला नाही? प्रशांतला दोन ते तीन वेळा चौकशीसाठी ताब्यात घेऊन पुन्हा सोडून दिलं होतं. त्यावेळी त्याने पलायन का केले नाही? दोनशे संशयीतांच्या चौकशीत सामुहीक बलात्काराच्या घटनेत फक्त एकच आरोपी असु शकतो का? प्रशांत हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. या अगोद ही त्याच्यावर दोन खटले चालू होतेे. म्हणून हे क्रुर कृत्य त्यानेच केले असेल का? असे प्रश्न लोकांना पडतं होते.
पोलीसांनी प्रशांतला न्यायालयात हजर केले. न्यायालयाकडून आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलीसांनी प्रशांतला अटक केल्यापासुन त्याचा भाऊ आणि वडिल रोज त्याला भेटायला जायचे. त्यावेळी तो वडिलांना म्हणायचा, "मी काहीच केलं नाही. तुंम्ही माझी काळजी करु नका. मी दोषी नाही. यांनी मला मारुन जरी टाकलं तरीही मी गुंन्हा कबुल करणार नाही. जो गुंन्हा मी केलाचं नाही तर का कबूल करायचा?" भावाला सांगायचा "काळजी घे आई पप्पाची." प्रत्येक भेटीच्या वेळेस सतत न घाबरता तो हेच बोलायचा. प्रशांतला ठोस पुरावा नसताना आरोपी म्हणून का घोषीत केला असेल? त्याचं कुटूंब परगावहून कामधंद्यासाठी माळवाडीत स्थलांतर झाल्यामुळे त्याच्या पाठीमागे कोणीही नाही म्हणून? राज्यातलं वातावरण कोपर्डी घटनेमुळे गढूळ झालेलं आणि पुन्हा या घटनेनं सामाजीक वातावरण दुषीत होऊ नये म्हणून? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडनुका तोंडावर आल्या होत्या. निवडणुकीवर काही दुष्परिणाम होऊ नये म्हणून पोलिसांना प्रशांतला आरोपी घोषीत करावा लागला? काहीचं कळतं नाही. पण एखाद्या निर्दोष व्यक्तीला मृत्यूच्या दाढेत उभं करणं चांगली गोष्ट आहे का? ज्यावेळी त्याला आरोपी घोषीत केला तेंव्हा त्याची आणि त्याच्या कुटूंबाची काय अवस्था झाली असेल? त्याला लोखंडी गजाआड पाहून त्याच्या आईची, वडिलाची अवस्था काय झाली असेल? घटना घडण्या अगोदर त्याच्या कुटूंबाचं असणारं सामाजीक स्थान असचं कायम अबाधीत राहील का? त्याच्यावर आणि त्याच्या कुटूंबावर बलात्काराचा पडलेला हा शिक्का समाज पुसून टाकेल का? आपला समाज एवढा सुसंस्कृत आहे का?
- के.प्रफुल्ल

No comments:
Post a Comment