आई मी मुंबईत सुखरुप पोहचलोय. तुला माहीतीय जशी टि.व्हीत मुंबई दाखवतात. तशीच ती धावती आहे. जिकडे बघेल तिकडे माणसंच माणसं आहेत. ती कधीच झोपतं नाहीय. रात्र अन् दिवस जागीच असते.
सकाळी कॉलेज. दुपारी काम. रात्री कामावरुन घरी जाण्याची घाई. गंच माणसांणी भरलेली लोकल. दादर ते मुलूंड हा तीस मिनीटांचा प्रवास. मुंबईच्या या गर्दीतून सावरता सावरता तुला फोन करायचा राहूनच गेला. मला माफ कर. मला माहीतीय तु नक्कीच जेवली नसणार. माझ्या काळजीत तु रडत ही असणार आहेस. अधीच मी एकुलता एक असल्यान तु मला मुंबईला शिकायलाही पाठवत नव्हती. मी मुंबईला शिकायला जाणार हे समजल्यावरच तु नाराज झाली होतीस. तू रडली ही होतीस. तु मला सारखी म्हणायचीस, "तु माझ्या पोटी एकटा अाहेस. माझ्या जीवात जीव असे पर्यंत मी माझ्या नजरे आड नाही करणार तुला. तुला जे काय करायच आहे ते गावातच कर. म्हणजे नजरेसमोर राहशील माझ्या". पण शर्यतीच्या धावत्या युगात तुझ म्हणनं पाठीमागे पडलं गं. मला नाही जमलं तुझ मन राखायला. कारण तुझ्या जन्मापासुन आलेल्या दारीद्र्याची मला ही किव आली होती. आपण ही काहीतरी करावं आणि या संकटातून बाहेर पडावं अस वाटत होत. म्हणून मी मुंबईला येण्याचा हंट्ट धरला. आणि तो तु पुर्ण केलास. पण तुझ्या धाडसाला ही सलाम गं. जन्मापासुन पंचवीस वर्ष मला स्वतापासुन कधीच दुर केल नाहीस. आईच कर्तव्य तर पार पाडलसचं. बापाचंही प्रेम कधी कमी पडू दिल नाहीस. शेवटी मी मुंबईला जाण्याचा आग्रह केला. तू नाराज होऊन का होईना पण मुंबईला जाण्यास परवानगी दिलीस. हिच तुझी खासीयत आहे.
लहाणपनापासुन आजवरचे सारे हट्ट तु पुरवलेस. तुला आठवतय जेव्हा मी लहान होतो. तेंव्हा मित्रांसोबत दिवसभर फिरायचो. घरी वेळेवर जेवायला नसायचो. तेव्हा तळमळीनं तु शोधायचीस. मी तुला खुप घाबरायचो. तुझ्या ओरडण्याचा आवाज माझ्या कानावर पडला की मी जिथे असेन तिथून तुझ्या समोर यायचो. तु ओरडायचीस. शिव्या द्यायचीस. मारायचीसही. मी जेव्हा रडायचो तेंव्हा पुन्हा मला मांडीवर घेऊन डोळे पुसायचीस. डोक्यावरुन हात फिरवायचीस. तुझा हा मायेचा हात जेव्हा डोक्यावरुन फिरेल तेंव्हा मी रडण थांबवून तसाचं झोपुन जायचो. कधी आजारी पडलो तर ताबडतोब दवाखाण्याची वाट धरायचीस. जोवर पुर्णपणे बरा होत नाही तोवर खुप काळजी घ्यायचीस. अगदी तळ हाताच्या फोडासारख जपायचीस. आज आजारी जरी पडलो ना तर तु नजरे समोर येतेस. आज हे सार कुठ तरी हरवल्यासारख वाटतय गं.
-के.प्रफुल्ल
No comments:
Post a Comment